कागलच्या दूधगंगा सहकारी दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

कागल -येथील दूधगंगा सहकारी दूध संस्थेच्या बिनविरोध निवड झालेल्या संचालकांचा सत्कार प्रसंगी शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, व सौ नवोदिता घाटगे व नवनिर्वाचित संचालक मंडळ सदस्य

कागल : कागल येथील श्री दूधगंगा सहकारी दूध संस्थेची सन 2022 ते 2027 कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक उमेदवारी अर्ज माघार घेणेच्या दिवशी संचालक मंडळाच्या रचनेइतकेच अर्ज शिल्लक राहिलेने बिनविरोध झाली.

शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल चिकणे यांनी काम पाहिले.

बिनविरोध निवड झालेल्या संचालकांचा शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते सत्कार केला.नुतन संचालकांची नावे अशी.संभाजी दत्तू नाईक, जयसिंग विश्वास माने, पंडितराव यशवंतराव चव्हाण, सूर्यकांत सु सुबुराव कदम, साताप्पा बाळासो घाटगे, संदीप दिनकर पसारे, उत्तम बाळू पाचगावे, संजय शिवाजी गाडेकर, धोंडीराम विठ्ठल खापरे, रेखा दशरथ बन्ने, रंजना विलास हुजरे आदी. उपस्थित होते.

🤙 9921334545