पराभवानंतर सहा महिने अज्ञातवासात जाणाऱ्यानी आम्हाला शिकवू नये ; मंत्री धनंजय महाडिक यांचा सतेज पाटलांना टोला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव ग्रामपंचायतच्या निकालानंतर हे दोन्ही दिग्गज नेते पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. मंत्री धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांनी केलेल्या टीकेवरून प्रतिक्रिया दिली. महाडिक म्हणाले की, पराभवानंतर सहा महिने अज्ञातवासात जाणाऱ्यांनी आम्हाला पराभव पचवण्याचे शिकवू नये.

अनेक पराभव पचवून आम्ही शिखरावर पोहोचलो आहे. उचगाव ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसने सत्ता कायम राखल्यानंतर ग्रामस्थांनी मोर्चा काढून फेरमतदानाची मागणी केली आहे. सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया देताना विजयाचा आनंदोत्सव साजरा करता तसा पराभव पचवण्याची देखील तयारी लागते अशी प्रतिक्रिया दिली होती.त्यावर प्रत्युत्तर देताना महाडिक यांनी आम्ही अनेक पराभव पचवून पुन्हा उदयास आलो आहे. त्यामुळे पराभवानंतर अज्ञातवासात जाणाऱ्यांनी आम्हाला पराभव पचवण्याचे शिकवू नये. उचगावमध्ये मतदान झाल्यानंतर सतेज पाटील यांनी गावात जाऊन अनेक ठिकाणी बैठका घेतल्या होत्या. अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप देखील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे उचगावातील ग्रामस्थांचं केवळ एकच म्हणणं आहे, की मतदानाची फेरमोजणी करावी. आपण ग्रामस्थांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. प्रशासकीय आणि न्यायालयीन पातळीवर गंभीरपणे पाठपुरावा केला जाईल असं धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे.दरम्यान, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील संवेदनशील असलेल्या उचगाव ग्रामपंचायतीच्या निकालावरून वाद सुरु झाला आहे. सोमवारी उचगावच्या ग्रामस्थांनी मोर्चा काढून निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी केली. आठ दिवसात ग्रामस्थांना निर्णय न कळवल्यास निवडणूक प्रशासकाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे उचगाव ग्रामपंचायतीच्या निकालावरून सतेज पाटील आणि महाडिक गटात वादाची ठिणगी पडली आहे.

🤙 9921334545