नीलम तोडकर ‘मैत्रीण’ पुरस्कारने सन्मानित

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील मैत्रीण फाउंडेशन हे गेली 13 वर्षे सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून होतकरू महिलांना मैत्रिण पुरस्कार देण्यात येतो. फाउंडेशनच्या वतीने नीलम स्वागत तोडकर यांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते मैत्रीण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

ज्या मैत्रिणी आपल्या संसाराला सांभाळून सामाजिक कार्यामध्ये नेहमी आपल्या परीने कार्य करत असतात. त्यापैकी नीलम तोडकर या आहेत. तोडकर यांचे सामाजिक कार्य अतिशय चांगले असल्याने त्या मैत्रीण पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

नीलमताई यांना लहानपणापासून सामाजिक कार्याची खूप आवड होती बी ए च्या शिक्षणानंतर त्यांचा विवाह स्वागत तोडकर यांच्याशी झाला सुरुवातीच्या काळामध्ये चूल आणि मूल करणाऱ्या नीलम ताईंना सामाजिक तळमळ स्वस्त बसू देत नव्हती संसार सांभाळत त्यांनी संपूर्ण ताकदीनिशी सामाजिक कार्यातही त्या नेहमी सक्रिय राहिल्या.

गोसंवर्धन, अंधशाळेला मदत, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तक वाटप, अनाथ मुलांना कपडे वाटप, कुष्ठरोग्यांना मदत, भिकाऱ्यांच्या लहान मुलांना स्वेटर व ब्लॅंकेट शिधा वाटप, शाळांमध्ये एलईडी वाटप, श्वान संवर्धन मदत, पूरग्रस्तांना मदत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कित्येक लोकांना त्यांनी छोटे मोठे उद्योग उभे करून देऊन संसार उभे केले. त्यासोबत रोजगार निर्मिती ही चांगल्या प्रमाणात केली स्वागत तोडकर नेहमी सांगतात त्यांच्या यशामध्ये सिंहाचा वाटा हा त्यांच्या सौभाग्यवती नीलम यांचाच आहे. अशा या संसार सांभाळून समाजकार्यात कार्यरत असणाऱ्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाच्या कार्याची दखल घेऊन मैत्रीण फाउंडेशन यांनी नीलम तोडकर यांना मैत्रीण पुरस्कार 2022 बहाल करून संसार सांभाळून सामाजिक कार्य करण्यास आणखीन प्रोत्साहन व ताकद दिली आहे. तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशन हे नेहमीच मैत्रीण फाऊंडेशन व संपूर्ण कोल्हापूर जिल्हा याचा ऋणी राहील असे गौरव उद्गार नीलम तोडकर यांनी पुरस्कार नंतर व्यक्त केले.

🤙 9921334545