पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला देश संविधानानुसारच चालवायचा आहे : कायदामंत्री किरण रिजिजू

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला देश संविधानानुसारच चालवायचा आहे.कोणी यात बिघडवण्याचा प्रयत्न केला तर देशवासियांना त्याचा विचार करावा लागेल, असं स्पष्ट मत केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केलं.

पूर्वीच्या सरकारांनी न्यायाधीशांच्या नियुक्तीवरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देशात अनेक परिस्थिती निर्माण झाल्या, असंही ते म्हणाले. अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या 16 व्या अधिवेशनात ते बोलत होते.कुरुक्षेत्र विद्यापीठात ते म्हणाले, ‘जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असतात. आपल्याला संविधानाच्या कक्षेत राहून काम केलं पाहिजे. घटनेनुसार काम झालं तर कोणाला बोट दाखवण्याची संधी मिळणार नाही. कोर्टात जी भाषा वापरली जात आहे, ती सोपी करण्यावर आमचा भर आहे. न्यायालयातील युक्तिवाद भारतीय भाषांमध्ये असणं आवश्यक आहे.’ तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन केलं. या अधिवेशनात देशभरातील 28 राज्यांतील दोन हजारांहून अधिक वकील सहभागी झाले होते.

🤙 9921334545