उचगाव ग्रामपंचायत निवडणूक पुन्हा घ्या .. आक्रोश मोर्चा द्वारे मागणी

कोल्हापूर : निवडणुकीतील नियम मोडणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो,पैसे वाटणाऱ्या महाठगांचा धिक्कार असो,लोकशाहीचा गळा कापणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणा करत उंचगाव ता.करवीर येथे लोकांनी मोठा जनआक्रोष मोर्चा काढला.

यावेळी ग्राम पंचायत निवडणुकीत चुकीच्या पद्धतीने काम केल्याचा आरोप करण्यात आला तसेच निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप केला.तसेच फेर मतमोजणी न देणाऱ्या प्रशासकिय अधिकाऱ्यांचा व पोलीस दलाचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.सामान्य मतदारांनी काढलेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला चुकीच्या पद्धतीने झालेली ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणुक घ्यावी अशी मागणी करण्यात आली. मोर्च्यात महिला मतदारांचा सहभाग लक्षणीय होता. जिल्हाधिकारी कार्यालय आल्यावर प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले.नितीन कदम,सुहास पाटील,अजित पाटील ,सतिश माळगी, पोपट यादव, महालिंग जंगम,नामदेव वाईंगडे, दत्तात्रय तोरस्कर,अनिल शिंदे,अभिजीत पाटील,उमेश देशमुख,अर्चना कांबळे,सोनाली कोप्पा, गीतांजली गायकवाड आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.

🤙 8080365706