
पुणे: साताऱ्यातील फलटण येथे आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात भाजपचे आमदार जयकुमार गोरे जखमी झाले असून त्यांच्यासोबतचे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

गोरे यांची कार 30 फूट खोल खड्ड्यात कोसळल्याने गोरे यांच्या छातीला मार लागला. गोरे यांच्यावर साताऱ्यातील रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना आता पुण्यातील रुबी रुग्णालयात आणण्यात आलं आहे. विशेष रुग्णवाहिकेतून त्यांना पुण्यात आणण्यात आलं असून त्यांना एमर्जन्सी वॉर्डात दाखल करण्यात आलं आहे.माण-खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे साताऱ्याहून आपल्या मतदारसंघाकडे येत असताना त्यांची फॉर्च्युनर गाडी 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली. आज पहाटे 3.30 वाजता साताऱ्यातील फलटण येथील मलठण येथे हा भीषण अपघात झाला.चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार खोल खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात जयकुमार गोरे यांनाही बराच मार लागला आहे. त्यांच्या छातीला, पाठीला आणि हाताला मार लागल्याचं सूत्रांनी सांगितलं.
