
कागल : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घरे मंजूर झाली आहेत , ज्यांना बांधकाम परवाना मिळालेला आहे, व ज्यांनी घराचे बांधकाम सुरू केले आहे त्या लाभार्थिना अनुदानाची रक्कम तात्काळ त्यांच्या खात्यावर वर्ग करा अशा सूचना भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी व शासकीय अधिकारी यांची बैठक श्री. घाटगे यांनी घेतली, त्यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेचे सी एल टी सी सचिन भोसले यांच्यासह अनेक लाभार्थी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले,कागल मध्ये या योजनेचे जवळपास 149 लाभार्थी असून काहीना घरे मिळाली आहेत. परूंतू 35 हून अधिक लाभार्थ्यांना बांधकाम परवाना मिळाला असून त्यापैकी काहींनी घरे बांधकामास सुरवात केली आहे.तरीही त्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही.त्यांचे अनुदान गट तट न पहाता दहा दिवसात त्यांचे खात्यावर वर्ग करा. ज्यांना बांधकाम परवाना मिळालेला आहे, त्यांनी घर बांधकाम सुरुवात करावी म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे अनुदान देणे सुरू होईल. तसेच ज्या लाभार्थीनी बांधकाम परवान्यासाठी अर्ज केले आहेत त्यातील त्रुटी तात्काळ दूर करून त्यांना बांधकाम परवाने द्या व ज्यांनी बांधकाम परवाण्यासाठी अद्याप अर्ज केले नाहीत. त्यांनी सत्वर आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करावेत , त्यांच्या अर्जाची छाननी होऊन त्यांना तात्काळ बांधकाम परवाना द्या, यामध्ये एजेंटगिरी होणार नाही याची दक्षता घ्या.अशाही सूचना दिल्या. ज्यामुळे लाभार्थीचे स्वतःच्या घराचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल.घाटगे यांनी घेतलेल्या बैठकीमुळे बरेच दिवस प्रलंबित असणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या या योजनेला गती मिळालेली आहे.यावेळी राजे बँकेचे संचालक राजू जाधव, विवेक कुलकर्णी, सौ.नम्रता कुलकर्णी, गजानन माने, स्वप्निल शिंगाडे, सुनील चौगुले , अरुण गुरव यांच्यासह लाभार्थी साऊबाई मिसाळ, इंदुबाई लोहार, शुभांगी सावंत, माधुरी बारड, आनंदा महालिंग पसारे उपस्थित होते…..
*चौकट* : —
अडीच वर्ष प्रलंबित प्रश्नास मिळणार गती…..यावेळी योजनेतील लाभार्थी साऊबाई मिसाळ म्हणाल्या, आम्हाला बांधकाम परवाने मिळूनही कांही लाभार्थी गेली अडीच वर्षे या अनुदानापासून वंचित आहेत,आमच्या या प्रश्नाकडे कोणीही लक्ष दिले नाही.मात्र राजेसाहेब यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन लाभार्थ्यांच्या अडीअडचणी व समस्या समजून घेतल्याने घरकुलाचे स्वप्न लवकर पूर्ण होईल असा विश्वास वाटतो.
