
कोल्हापूर : दिनांक २६ डिसेंबर पासून उदयपूर राजस्थान येथे सुरु होणाऱ्या वेस्ट झोन आंतर विद्यापीठ महिला हॉकी स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी विद्यापीठ महिला हॉकी संघाच्या कर्णधार पदी कु. सिद्धी संदीप जाधव हीची निवड झाली आहे.

सिद्धी जाधव ही शहाजी कॉलेज दसरा चौक ची विद्यार्थी असून तिला संदीप पाटील (इस्लामपूर), प्रशांत पाटील, प्रशांत मोटे (शहाजी कॉलेज), सागर जाधव, राहुल गावडे, संताजी भोसले, संतोष चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले तसेच द हॉकी कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी व सदस्यांचे प्रोत्साहन लाभले आहे.
