
कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या साथीने काँग्रेसने संपूर्ण जिल्ह्यात घवघवीत यश संपादन केले आहे. असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.

गगनबावडा आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने स्पष्टपणे कौल दिला आहे. तसेच जिल्ह्यातही महाविकास आघाडीचे उमेदवार मताधिक्याने विजयी झाले आहेत. ग्रामपंचायती मधील विजयाची ही परंपरा महानगरपालिका, जिल्हा परिषद, आणि पंचायत समितीच्या निवडणूकीतही सुरू राहील असे प्रतिपादन करत महाविकास आघाडीच्या सर्व लोकनियुक्त सरपंच, सदस्यांचे कॉग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी अभिनंदन केले.
