
कोल्हापूर : क्राबी, थायलंड येथे पार पडलेल्या ओशनमन आशियाई जलतरण स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत कोल्हापुरातील श्लोक राहुल पांडव याने १ किलोमीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि यशवर्धन अमरीश मोहिते याने ५ किलोमीटर स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.

श्लोक राहुल पांडव हा राधाबाई शिंदे इंग्लिश मिडीयम शाळेत इयत्ता ३री मध्ये शिकत असून गेले २ वर्षांपासून जलतरणाचे प्रशिक्षण प्रशिक्षक निळकंठ तुकाराम आखाडे यांच्याकडे जिम निलू स्विम टीम मध्ये घेत आहे.या कमी कालावधीत श्र्लोक ने विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केली असल्याचेही आखाडे यांनी यावेळी सांगितले.श्लोक पांडव याची विविध स्पर्धेतील कामगिरी : १. विजयदुर्ग येथे पार पडलेल्या सागरी जलतरण स्पर्धेत ३०किमीचे अंतर वयाच्या ८ व्या वर्षी ९ तासात पोहून स्पर्धेतील सर्वात लहाण खेळाडूचा मान पटकावला.२. मॉर्डन पेंथातलॉन राष्ट्रीय स्पर्धेत २ सुवर्ण व २ रौप्य पदक पटकावले.३. २१ किमी रगेडियन कोल्हापूर रण धावण्याची स्पर्धा २ तास ५ मी. मध्ये पूर्ण करत सर्वात लहान खेळाडूचा मान पटकावला.४. राष्ट्रिय जलतरणपटू सागर पाटील जलतरण तलाव कोल्हापूर येथे आयोजित लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती लोकोस्तव जलतरण स्पर्धेत सर्व प्रकारात ८ सुवर्ण पदक पटकावून वैयक्तिक विजेतेपद ट्रॉफी जिंकली.५. अश्याच बऱ्याच विविध स्पर्धांमध्ये आतापर्यंत ३५ पदकांची लयलूट केली.यशवर्धन मोहिते वय वर्ष १९, हा भारती विद्यापीठ येथे शिक्षण घेत आहे.याने गेले बऱ्याच वर्षांपासून विविध स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केली आहे.श्लोक व यश हे दोघे दररोज सकाळी राजाराम तलाव व संध्याकाळी रमणमाळा जलतरण तलाव येथे प्रशिक्षक निळकंठ आखाडे यांच्याकडे सातत्याने सराव करत आहे.त्याला अजय पाठक, शिवतेज पवार यांचे मार्गर्शन लाभले. तसेच कोल्हापूर शहर पोलिस उप-निरीक्षक मंगेश चव्हाण, कोल्हापूर करवीर पोलिस उप-निरीक्षक संकेत गोसावी, लाच लुचपत उप-निरीक्षक आधिनात बुढवण, पो.नि. राजेश गवळी, ॲड. सुभाषचंद्र पवार यांचे सहकार्य लागले. या सर्वांसाठी त्याचे आई- वडील, आजी – आजोबा तसेच कुटुंबातील सर्वांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे.यावेळी या पत्रकार परिषदेस श्लोक ची आई महेश्वरी,वडील राहुल पांडव उपस्थित होते.
