पासार्डेत सत्तांतर…विजयी निवडणूक रॅलीवर विरोधकांची दगडफेक, एक जखमी चौघांवर गून्हे दाखल …गावाला पोलीस छावणीचे स्वरूप….

बहिरेश्वर सन २०२२ ते २०२७ सालाकरिता नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शंभु महादेव भेंडाईदेवी ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून पॅनेल प्रमुख के के चौगले, संभाजी चाबूक,लकुळा पाटील यांचे पॅनेलने सरपंच पदासह ५जागा जिंकत सत्ता स्थापन केली आहे. विजयी आघाडीचे ४ उमेदवार अवघ्या २-३ मतांनी पराभूत झाले आहेत. गतवेळच्या निवडणुकीत बाजीराव चौगले यांच्या पॅनेलने सरपंचपदासह ६ जागांवर विजय मिळविला होता यंदा मात्र त्यांना केवळ ४ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. लोकनियुक्त सरपंच पदी विष्णू पाटील यांची निवड झाल्यानंतर गावातुन विजयी रॅली काढण्यात आली यावेळी पराभूत नागरिकांनी विजयी रॅली वर दगडफेक केली.

यात बोलेरो गाडीचे नुकसान तसेच भरत चौगले हे जखमी झाले आहेत. यामध्ये रणजित बाजीराव पाटील, राजाराम निवृत्ती पाटील, बाजीराव निवृत्ती पाटील,सर्जेराव निवृत्ती पाटील यांचे विरोधात करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.जखमी भरत शिवाजी चौगले यांचेवर सी पी आर रूग्णालयात उपचार सुरू आहेत अधिक तपास पो.जालींदर पाटील करत आहेत.

🤙 8080365706