
आकोला : महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यानंकडून महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहेत.आज काँग्रेसचे नेते आणि प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यांनी छत्रपती शिवाजी महाराजां बदल वादग्रस्त वक्तव्य केला आहे.
कुणबी समाजाने खऱ्या अर्थाने राज्याला नेतृत्व दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी समाजाचे होते, त्यांनी नेतृत्व व राज्य कसे असावे, याची दिशा राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला दिली. महाराजांच्या पावलावर पाऊल ठेऊन आपण कार्य करीत आहोत, असे पटोले म्हणाले. अकोल्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असतांना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नानांनी शिवरायांबाबत केलेल्या या विधानामुळे आता नवा वाद उसळण्याची शक्यता आहे.नाना पाटोले अकोल्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असतांना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला आपले नेतृत्व मोठे व्हावे, असे अपेक्षित असते. समाजाचे नेतृत्व राहावे, ही काळाची गरज आहे. कुणबी हा अन्नदाता समाज आहे. देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या (suicide) मोठ्या प्रमाणात होत आहे. आत्महत्या करू नका, ज्या व्यवस्थेकडून आत्महत्या करायला बाध्य केले जात आहे, त्यांना आत्महत्या करायला लावा, असे आवाहन पटोले यांनी केले. कुणबी समाजात माझ्यापेक्षाही अनेक मोठे नेते आहेत. प्रत्येकाला समाजाचे देणे लागते. समाजासाठी सातत्याने कार्य करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असते. त्यानुसार मी कार्य करीत असल्याचे पटोले यांनी सांगितले.
