महाशिवरात्रीपूर्वी विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यात येणार; जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : महाशिवरात्रीपूर्वी विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिवदुर्ग संवर्धन समिती सदस्यांच्या बैठकीत दिली.

विशाळगडावरील अवैध धंदे रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त देणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार संभाजीराजे यांनी, विशाळगडावर ज्यांनी अतिक्रमण केले आहे, ते सर्वच काढा; त्यात हिंदू-मुस्लिम असा कोणताही वाद नसून, विशाळगडाची ओळख ही शौर्यस्थान म्हणून निर्माण करण्याची गरज आहे, असे सांगितले.विशाळगडावर गेल्या काही वर्षांपासून पुरातत्त्व खात्याचे नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामे होत आहेत. तेथे अनेक अवैध व्यवसाय होत असल्याची बाब हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. याअनुषंगाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलवण्यात आली. यामध्ये विशाळगडावरील ग्रामस्थ व दुर्गप्रेमी उपस्थित होते.

🤙 8080365706