संजय राऊत बोकडाची औलाद ; आ.संजय गायकवाड यांची जहरी टीका

बुलढाणा : शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी ठाकरे गटातील खासदार संजय राऊत बोकडाची औलाद आहेत, असं म्हणत जहरी टीका केली.

यानंतर आता शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी आमदार गायकवाडांना एका वाक्यात प्रत्युत्तर दिलं.

यावेळी राऊतांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवरही प्रतिक्रिया दिली. ते बुलढाण्यात बोलत होते.संजय गायकवाडांनी संजय राऊतांवर केलेल्या टीकेविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर विनायक राऊत म्हणाले, “असल्या घाणेरड्या औलादींना आम्ही जास्त किंमत देत नाही.”

🤙 8080365706