
मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे तर दुसरीकडे त्यांनी आमदार पदाचा राजीनामाही दिला आहे. त्यावरुनच सुषमा अंधारे यांनी राम कदम यांच्यावर निशाणा साधत हा सवाल केला आहे.त्यामुळे राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे.
राजीनामा नाट्यवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत.सुषमा अंधारे यांनी राम कदम यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या काही आठवणी जागा केली आहेत. राम कदम एका जाहीर कार्यक्रमामध्ये युवकांना म्हणाले होते की, हे राम कदम तेच आहेत जे म्हणाले होते की, कोणती पोरगी आवडते ते सांगा, मी उचलून आणतो. या वाक्यावर भाजप का शांत बसले होते.तेव्हा राम कदम यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.त्यावरुन सुषमा अंधारे म्हणाल्या की, तेव्हा भाजपला लाज कशी वाटली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे राम कदम यांचा या वादाचा मुद्दा पुन्हा उफाळून येणार असल्याचे दिसत आहे…
