
कोल्हापूर : गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यावरून कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय महामोर्चाची घोषणा करण्यात आल्यानंतर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
गायरानवरील अतिक्रमण काढून घेण्याचा हा निर्णय सर्वस्वी न्यायालयाचा आहे. तरी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे, तसेच व्यक्तीगत आपलाही अतिक्रमण काढण्याला विरोध असल्याचेही त्यांनी त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.गायरान जमिनीच्या अतिक्रमणावरून विरोधक लोकांना उकसवण्याचा हा प्रकार असल्याची टीका ना. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. तसेच कायद्यामध्ये बदल करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतील. तोपर्यंत अतिक्रमण काढू नये याबाबत उपमुख्यमंत्री विनंती करणार आहे. सरकार याबाबत पुनर्विचार याचिका दाखल करतील. कोल्हापूर जिल्ह्यातील गायरान जमिनीतील अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाविरोधात १५ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय महामोर्चा काढणार असल्याची माहिती आ. सतेज पाटील यांनी दिली आहे.गायरान जमिनीतील अतिक्रमणे काढण्यासाठी तालुका स्तरावर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश दिले आहेत. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात १ लाखांहून अधिक अतिक्रमणे निघण्याची शक्यता असून त्यामुळे सहा लाखांवर बेघर होणार आहेत.
