
कोल्हापूर : कोल्हापूर अर्बन बँकेसाठी अत्यंत चुरशीने प्रचार झाला मात्र, मोठ्या प्रमाणात मतदान झाले नाही. या निवडणुकीत फक्त ४८ टक्के इतके मतदान झाले.
एकूण मतदान २८,७०२ पैकी १३,७९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमर शिंदे यांनी न्यूज मराठी २४ शी बोलताना दिली.या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्हीही पॅनेलने शहराचा कोपरा नि कोपरा पिंजून काढला होता. वैयक्तीक भेटीगाठीबरोबरच सकाळी व सायंकाळी निघणाऱ्या पदयात्रांनी शहरातील पेठापेठांतील वातावरण ढवळून निघाले होते. मतदानही इतक्याच चुरशीने होणार असल्याचा अंदाच वर्तवला जात होता. मात्र या निवडणुकीच्या मतदानाला मतदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने ४८ टक्केच मतदाना झाले.मतदानाची सुरुवात सकाळी ८ वाजता झाली, सकाळच्या सत्रापासून मतदानाचा जोर होता. उन्हाच्या तडाख्यामुळे दुपार नंतर मतदार कमी प्रमाणात मतदान केंद्रावर दिसले. संध्याकाळी ५ च्या सुमारास मतदानाची वेळ संपली. दरम्यान मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण काळजी घेण्यात आली होती, कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
