मीरा भाईंदर महापालिकेच्या नाट्यगृहातील पहिला प्रयोग रद्द

भाईंदर: मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नव्याने तयार झालेल्या नाट्यगृहात रविवारी होणारा पहिला नाटक प्रयोग रद्द करण्यात आला आहे.

नाट्यगृहाचे काम योग्य नसल्याने आरोप व्यवस्थापकांनी केला आहे.मीरा भाईंदर महानगरपालिकेने ‘भारतरत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर हे नाट्यगृह तयार केले आहे या नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यात आले होते.

रविवारी ३८ कृष्ण वीला’ या नाटकाद्वारे नाट्यगृहाचा पहिला प्रयोग आयोजित करण्यात आला होता. मात्र नाटकाच्या दोन दिवसापूर्वी नाटक व्यवस्थापकांनी नाट्यगृहाची पाहणी केली असता नाट्यगृहातील ध्वनीक्षेपक यंत्रणातील बिघाड आणि आवश्यक असलेल्या लाईटची सुविधा सुरळीत नसल्याचे आढळले. त्यामुळे नाटक रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यापूर्वी देखील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कार्यक्रमात ध्वनीक्षेपक यंत्रातील बिघडाची बाब समोर आली होती.

🤙 8080365706