महाराष्ट्रात उद्योजकांना रेड कार्पेट: उदय सामंत

ठाणे:’महाराष्ट्रातून हे उद्योग गेले, ते उद्योग गेले, असे आरोप केले जातात. पण, राजकारण मैदानात करू, नाहक महाराष्ट्राला का बदनाम करता?’ असा सवाल करीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी, केला.आमचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात उद्योजकांना ‘रेड कार्पेट’ घातले असून नवीन उद्योगांना उत्तम पॅकेज देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अतुल राजोळी यांच्या ‘लक्ष्यवेध’ व गणेश दरेकर यांच्या ‘अ‍ॅडमार्क मल्टीवेंचर’च्या सहयोगाने ‘टीपटॉप प्लाझा’ येथे लघुउद्योजकांची बिझनेस जत्राच्या उद्घाटन सोहळ्यात सामंत बोलत होते. शनिवार, दि. 12 नोव्हेंबर रोजी या जत्रेचा समारोप होणार आहे. यावेळी व्यासपीठावर ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे ललित गांधी, ‘कोसिआ’चे निनाद जयवंत आदी मान्यवर उपस्थित होते.

🤙 8080365706