खवरेंनी खुल्या चर्चेसाठी समोर यावं-धनाजी पाटील

शिरोली (प्रतीनिधी) : नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी,मूळ मुद्दे बाजूला ठेऊन खवरे जिल्ह्यातील इतर मुद्द्यांवर आणि खोटं बोलतात.यातून त्यांचा पळपुटेपणा दिसून येतो.आम्ही पुराव्यासह सप्रमाण भ्रष्टाचाराचे जे आरोप त्यांच्यावर केले आहेत ते खरे असल्याचे यामुळे सिद्ध होते.खवरेंनी त्यांची सर्व बिले आणि कागदपत्रे घेऊन जनतेसमोर तसेच माध्यमांसमोर यावं. आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत असे आवाहन शिरोली विकास सोसायटीचे संचालक धनाजी पाटील यांनी माजी सरपंच खवरे यांना केले आहे.

माजी सरपंच खवरे म्हणाले की, ‘आम्ही पाच वर्षात घनकचरा उचलणे, दिवाबत्ती, मलप्रणाल आणि स्वच्छतेसाठी १ कोटी २७ लाख रुपये खर्च केला आहे. तर महाडिक गटाची २०१२ ते २०१७ या काळात सत्ता असताना १ कोटी ४४ लाख रुपये खर्च करण्यात आला. परंतु त्यांचा १ कोटी २७ लाख हा खर्च फक्त तीन वर्षातील आहे व ही आकडेवारी आम्हीच दिली आहे. म्हणजे खवरे यांचा ‘खोटं बोल पण रेटून बोल’ हा गुणधर्म इथे दिसत आहे. आमची अशी मागणी आहे की त्यांचा आणखी दोन वर्षातील खर्च काढण्यात यावा. तसेच या सर्व पाच वर्षातील खर्चाची बिले ज्यांच्या नावावर काढण्यात आली आहेत, त्या सर्वांना गावासमोर बोलावून घेऊन ते खरंच कचरा उचलणारे ठेकेदार आहेत का याची शहानिशा करण्यात यावी अशी मागणी हि करण्यात आली.

इतर कोणत्याही सदस्यांच्या परवानगीने ही बिले काढलेली नाहीत. याउलट मासिक सभांमध्ये दिशाभूल करून या बिलांची मंजुरी घेण्यात आली. कोणतेही कंत्राट प्रशासकीय सहीशिवाय संमत केले जात नाही. त्यामुळेच सरपंच-उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी या तिघांनी संगनमताने केलेल्या या भ्रष्टाचाराच्या चौकशी व्हावी असेही पाटील यांनी म्हटले आहे. 

खवरेंच अस म्हणणं आहे की ‘हे नागरिक महाडिक गटाचे आहेत म्हणून माझ्यावर आरोप करतात. त्यांना मनावर घेऊ नका.’ महाडिक गटाचे असो किंवा आणखी कोणत्याही गटाचे असो पण आम्ही शिरोली गावचे नागरिक आहोत. त्यामुळे आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणं हे खवरे यांच आद्य कर्तव्य आहे. परंतु खवरे नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

🤙 8080365706