कागल (प्रतिनिधी) :
इंडोकाउंट सूतगिरणीच्या कामगारांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत व त्यांच्या योग्य मागणीबाबत मी ठामपणे त्यांच्या पाठीशी राहणार आहे.अशी ग्वाही शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.गोकुळ शिरगाव ता.करवीर
एमआयडीसीमधील इन्डोकाउंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या डावलण्यासाठी कंपनी मॅनेजमेंटने दिनांक १७/१०/२०२२ रोजी टाळेबंदी जाहीर केली होती.त्यामुळे कंपनीच्या कामगारांनी न्याय मागणीसाठी तात्काळ राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या कडे धाव घेऊन कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने घाटगे यांनी कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे व सहा.कामगार आयुक्त श्री अनिल गुरव यांच्याशी चर्चा घडवून व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय साधला व टाळेबंदी उठवून कर्मचाऱ्यांना पूर्वत कामावर घेण्यास भाग पाडले होते.ही ताळेबंदी उठवल्यामुळे “ब” युनिट च्या जवळपास 150 हून अधिक कर्मचाऱ्यांचा रोजगाराचा प्रश्न मिटलेला आहे.
या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनेच्या वतीने घाटगे यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार केला.
यावेळी जयवंत रावण, रमीज मुजावर,चेतन भगले, हणमंत वडड..बाळू नाईक आदी उपस्थित होते.