शामराव खोत ‘या’ पुरस्काराने सन्मानीत

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : हणबरवाडी (ता.करवीर) येथील स्थानिक देवस्थान समितीचे संस्थापक अध्यक्ष शामराव खोत यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक सेवेबद्दल खोत यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी पुरस्कार वितरण समिती,बेळगाव यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.

 जनसेवा हीच ईश्वर सेवा या विचाराने शामराव खोत यांनी गेली चार दशके हणबरवाडी गाव आणि कोल्हापूर या ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटवून सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे. वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा त्यांना त्यांचे वडील स्वर्गीय दादा खोत यांच्याकडून मिळाला. आणि त्यांच्यावरती सामाजिक संस्कार घडले. 1985 मध्ये खोत यांनी गावातील महालक्ष्मी मंदिराच्या जिर्णोद्वारामध्ये विशेष सहभाग घेतला त्यामुळे ग्रामस्थांनी स्थानिक देवस्थान समितीचे स्थापना करून त्यांना अध्यक्ष पद दिले. लोकवर्गणी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची आर्थिक मदत घेत त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्यातून महालक्ष्मी मंदिराची उभारणी केली.

वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन त्यांनी गावात ज्ञानेश्वरी पारायण सुरू केले. त्यामुळे गावात अध्यात्मिक वातावरणाची जोपासना झाली. 1992 पासून हनबर समाजाच्या हितासाठी काम सुरु केले. समाजाच्या विविध प्रश्नांचा,अडचणींचा अभ्यास करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे त्यांची २०११ मध्ये हनबर गवळी उन्नती संस्थेवर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली. या संस्थेवर त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडून संस्थेच्या प्रगतीसाठी भरीव योगदान दिले. त्याच बरोबर गावच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करून योगदान दिले.     

त्यांच्या या विविध क्षेत्रातील सामाजिक कार्याची नोंद घेऊन महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यामध्ये काम करणाऱ्या आंतरराज्य पुरस्कार वितरण समिती बेळगाव यांच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनुर यांच्या शुभहस्ते सहकार रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोहिली,आमदार निलेश लंके, माजी खासदार अमरसिंह पाटील,माजी आमदार संजय पाटील हे प्रमुख उपस्थित होते.

🤙 9921334545