तर मग कोल्हापुरात आणि महाराष्ट्रात तांडव होईल-आ.नितेश राणे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह कोल्हापुरातील लव्ह जिहाद आणि धर्मांतर प्रकरण समोर येत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल होत असून देखील पोलीस तपास करत नाहीत. या घटनेला १५ दिवस होवून देखील काही केले जात नाही. राज्यात धर्मांतर विरोधी कायदा नसल्यामुळे काही मोजके अधिकारी आणि पोलीस उडवाउडवीची उत्तर देत आहेत असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. कथित लव्ह जिहाद प्रकरणी आज (बुधवारी) कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुढे बोलताना आमदार राणे म्हणाले की, महाराष्ट्रात धर्मांतराच्या घटना वाढल्या आहेत. आम्ही काही दिवसांपूर्वी फोन केला मग पोक्सो कायदा लावला. आई- वडील आणि इतरांना तुम्हाला काय करायचे ते करा अस इथले अधिकारी बोलत आहेत. काही जिहादी तरुण प्रेम प्रकरण करतात, त्यानंतर लग्न करतात. त्यानंतर तीच धर्मांतर केले जाते. अनेक मुली गायब होतात. त्यानंतर त्या सौदी आणि अरब देशात असतात. पोलीस अधिकारी जो पर्यंत जिहादी मुलांना शिक्षा देत नाहीत तो पर्यंत हे थांबणार नाही. महाराष्ट्रात मुलींना पळवून नेण्यासाठी रेट कार्ड लागले आहेत. मुलींना फसविण्यासाठी मुस्लिम तरुणांना पैसे आणि मोटारबाइक दिली जाते. मी अनेक मुस्लिम धर्मगुरूंना अवाहन केले आहे, तुम्ही तुमच्या मुलांना आवरा म्हणून, अन्यथा आमचा संयम सुटेल, असच सुरु राहिल तर आम्ही कायद्याचा विचार करणार नाही, तुम्ही आमच्या मुलींना टार्गेट करणार असाल तर आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही आवाहन देत बसणार नाही,आम्हाला धर्म रोखण्यासाठी शस्त्र उचलण्याची मुभा दिली आहे. तुमचे डोळे कसे फाटून ठेवायचे हे आम्हाला माहिती आहे. मुलगी परत आल्यानंतर तीच भविष्य आम्ही घडवू असेही ते म्हणाले.

एक कडवट हिंदुत्ववादी व्यक्ती आज गृहमंत्री म्हणून बसला आहे. दिलेली जबाबदारी पूर्ण करा, अन्यथा मंत्रालयात बसलेला व्यक्ती गप्प बसणार नाही, असा इशारा पोलिसांना दिला. अनेक पोलीसांना वाटतय आजही महाविकास आघाडीचे सरकार आहे. महाराष्ट्रात धर्मातर विरोधी कायदा नसल्यामुळे पोलीस उडवाउडवीची उत्तर देतात. येणाऱ्या अधिवेशनात तसा कायदा आणावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही राणे म्हणाले. यावेळी राणे यांनी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही टिका केली.

🤙 9921334545