कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशातील सर्व जन आंदोलनाच्या वतीने व स्वराज इंडिया पक्षाच्या पुढाकाराने भारत जोडो यात्रेला पाठींबा देणारी संविधान बचावो जनसंवाद यात्रा कोल्हापुर मधून निघणार आहे. या यात्रेच्या उद्धाटनप्रसंगी स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक,जेष्ठ विचारवंत,समीक्षक आणि शेतकरी आंदोलनाचे नेते योगेंद्र यादव हे उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापूर समता भूमी ते नांदेड या मार्गावरून जाणारी ही यात्रा दिनांक २ नोव्हेंबर २०२२ ते ११ नोव्हेंबर २०२२ अखेर असणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापुर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातून जन संवाद करीत सदर यात्रा आयोजित केली आहे.
दि.२ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वा. बिंदू चौक येथे अभिवादन करून पद यात्रेने दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर शाहू स्मारक भवन येथे सकाळी ११.०० वा.जाहीर सभा होणार आहे. या वेळी महाराष्ट्रातील पुरोगामी व परिवर्तनवादी विचारांचा वारसा सांगणा-या साहित्यिकांची ग्रंथसंपदा आदरणीय योगेंद्र यादव यांना भेट म्हणून देण्यात येणार आहे. यावेळी आ.हसन मुश्रीफ, आ. पी. एन. पाटील, आ.जयश्रीताई जाधव, आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत आसगांवकर, माजी आ. संपतराव पवार पाटील, श्रीपतराव शिंदे, विजय पोवार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर दुपारी इचलकरंजी व सायंकाळी जयसिंगपुर येथे ही पद यात्रा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नफरत छोडो संविधान बचाव या यात्रेसाठी राष्ट्रीय काँग्रेस कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आ.सतेज उर्फ बंटी पाटील यांचे बहुमोल असे सहकार्य व सहभाग असल्याचे यात्रा संयोजक स्वराज इंडिया पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ललित बाबर व राष्ट्र सेवादलाचे बाबासाहेब नदाफ यांनी सांगितले आहे.
यात्रेच्या संयोजन मध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. सतेज उर्फ बंटी पाटील, गुलाबराव घोरपडे, दलित मित्र व्यंकप्पा भोसले, वसंतराव पाटील बापू, शिवाजीराव परुळेकर, प्राचार्य टी .एस . पाटील भरत लाटकर, सचिन चव्हाण, आर. के. पोवार, भरत रसाळे, राजु लाटकर, कॉ. सतीश कांबळे, रवी जाधव, कॉ. अतुल दिघे, कॉ. चंद्रकांत यादव, गौतम कांबळे, गणी आजरेकर, वसंतराव मुळीक, प्रभा यादव, कल्पना मोहिते, शैला कुरणे, भाई दिलीप पवार, वैभव कांबळे, विजय भोगम, सुनील पोवार, शाहजी गोंगाने, गणपती शिंदे हे मान्यवर सहभागी होत आहेत.