डी.वाय.पाटील ग्रुपमधील विद्यार्थी घेणार ‘शिवप्रताप गरुडझेप ची अनुभूत

कसबा बावडा (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल आणि थरारक इतिहास विद्यार्थ्यांना समजावा यासाठी डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या संकल्पनेतून ‘शिवप्रताप गरुड झेप’ हा ऐतिहासिक चित्रपट  ग्रुपमधील पाच हजार विद्यार्थ्यांना मोफत दाखविण्यात येणार  आहे. या उपक्रमाचा प्रारंभ गुरुवारी करण्यात आला.

 डॉ. अमोल कोल्हे निर्मित आणि अभिनित ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास सांगणारा चित्रपट ‘ प्रदर्शित झाला आहे. अभिनेते डॉ. कोल्हे यांनी डॉ.संजय डी.पाटील यांची भेट घेवून त्यांना प्रीमियर शोसाठी आमंत्रित केले होते. छ. शिवाजी महाराज यांचा इतिहास  नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना समजावा,  यासाठी हा चित्रपट  डीवाय पाटील ग्रुपमधील शाळा व कॉलेजच्या 5 हजार विद्यार्थ्यांना दाखवायचा निर्णय डॉ. संजय डी पाटील यांनी घेतलाआहे. त्यानुसार बुधवारी ‘पीव्हीआर’  मध्ये डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या तर गुरुवारी तळसंदे टेक्निकल कॅम्पसच्या  विद्यार्थ्यांनी हा सिनेमा मोफत पाहण्याचा आनंद घेतला.

छ.शिवाजी महाराजांचा हा प्रेरणादायी चित्रपट पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये जोश निर्माण झाला. अनेक विद्यार्थी सिनेमा पाहून भावूक झाले. ‘छ. शिवाजी महाराज की जय’अशा जोरदार घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी  उत्स्फूर्तपणे सिनेमाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

शिवरायांचा जाज्वल, थरारक इतिहास बघण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील व डॉ. अमोल कोल्हे  यांचे आभार मानले.

🤙 9921334545