नवरात्रोत्सव काळात भाविकांना मुलभूत सोयी सुविधा पुरवा : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : गत चार ते पाच वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमार्फत विविध विकासकामे सुरु आहेत. परंतु, सदर कामे मुदतीत पूर्ण होत नाहीत त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. ऐन नवरात्रोत्सव काळात लाखो भाविक श्री अंबाबाईच्या दर्शनाला येत असतात. येणाऱ्या भाविकांना मुलभूत सोईसुविधा देणे देवस्थान समितीची जबाबदारी त्याअनुषंगाने या नवरात्रोत्सवात भाविकांची गैरसोय होवू नये, कोणतीही तक्रार येवू नये, याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात. स्थानिक व्यापाऱ्यांचाही या काळात व्यवसाय व्हावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे. देवस्थान समितीची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावावीत आणि प्रस्तावित आराखड्यांच्या प्रती सादर कराव्यात. याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मंत्रालय स्थरावर बैठक लावू, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

नवरात्रोत्सव तयारी आणि प्रलंबित कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीच्या सुरवातीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, येत्या नवरात्रोत्सवात देवस्थान समितीच्या वतीने भाविकांसाठी पार्किंग, मंडप व्यवस्था, स्वच्छतागृह, मंदिर परिसरातील दुकानदारांच्या समस्या, सुरक्षा रक्षकांकडून भाविकांशी होणारे वाद, भाविकांच्या मालमत्तेची सुरक्षा, देवस्थान समिती अंतर्गत सुरु असलेली विकासकामे, त्यातील प्रलंबित कामे, प्रस्तावित विकास कामे आदीबाबत माहितीची विचारणा केली.

याबाबत माहिती देताना देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी, भाविकांच्या वाहनासाठी सुमारे ११ ठिकाणी पार्किंग जागांचे नियोजन करण्यात आले आहे.

या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, देवस्थान समितीचे उप- अभियंता सुयश पाटील, लेखापाल धैर्यशील तिवले, वास्तुविशारद राजेंद्र सावंत, वास्तुविशारद मनोज पंडीत, रणजीत निकम, ठेकेदार संकल्प पाटील आदी उपस्थित होते.


🤙 9921334545