कोल्हापुरची विसर्जन मिरवणुक ओक्केचं ; पावसातही लाडक्या बाप्पाला निरोप 

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापुरात सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक काल शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. लाडक्या बाप्पाला कोल्हापुरकरांनी जड अंतकाराने आणि भक्तिमय वातावरणात निरोप दिला.

मानाच्या तुकाराम तालीम मंडळाच्या गणपतीने सकाळी ९ वाजता विसर्जन मिरवणुकीस सुरवात झाली. मिरवणुकीच्या सकाळच्या सत्रात ढोल-ताशा,लेझीम, पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणुक सुरु झाली. दुपारनंतर अचानक आलेल्या पावसाने मिरवणुकीमध्ये थोडा व्यत्यय आला. पावसाचा जोर वाढल्याने  कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली. मिरवणुकीमध्ये आपल्या तालमीचा,मंडळाचा ठसा उमटवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले.

दरम्यान सायंकाळी आकर्षक लेजर शो, त्याला साजेशी साऊंड सिस्टीम आणि त्यावर थिरकणारी तरुणाई यामुळे  विसर्जन मिरवणुकीत आणखीनचं जल्लोष पाहायला मिळाला. जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करत तरुण मंडळानी रात्री १२ वाजता साऊंड सिस्टीम बंद केली. थोडाफार किरकोळ वाद सोडता यंदाची विसर्जन मिरवणुक ओक्केचं झाली.