सांगली (प्रतिनिधी) : शिक्षक राष्ट्र निर्मितीचे काम करत असतात. भावी पिढी घडवण्याचे पवित्र कार्य त्यांच्या हातून घडत असते. समाजातील त्यांचे स्थान आढळ आहे, असे प्रतिपादन कासेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांनी केले.भाटवडे ता.वाळवा येथे येथे ग्रामस्थांच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांचा सत्कार संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वाटेगाव संयुक्त पाणीपुरवठा संस्थेचे उपाध्यक्ष अशोक देवकर होते.

दरम्यान, राजारामबापू दूध संघाचे माजी संचालक हरिश्चंद्र औताडे, सोसायटीचे संचालक शिवाजी रोकडे, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष राजकुमार पाटील, दीपक रोकडे, संगीता रोकडे, चंद्रकांत गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच सतीश डोंगरे, संजय केसरे, संभाजी यादव, संतोष डोंगरे, बाबुराव निकम,दिनकर गुंड, सुनील निकम, सिता रोकडे, संस्कृती रोकडे उपस्थित होते. यावेळी स्वागत उत्कर्ष रोकडे यांनी केले. आभार संदेश सुतार यांनी मानले.