कागल येथे ‘त्या’ लाभार्थ्यांना धनादेश वाटप

कागल प्रतिनिधी : शहरातील चार लाभार्थ्यांना रमाई आवास घरकुल योजनेतील मंजूर रकमेचे धनादेश वाटप करण्यात आले. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. यामध्ये नीलम बल्लाळ, कल्पना नाईक, अंजना जाधव व सचिन सोनुले यांचा समावेश आहे.

बऱ्याच कालावधीपासून रमाई आवास योजनेतील हे लाभार्थी या रकमेपासून वंचित राहिले होते. याबाबत घाटगे यांनी राज्य शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर या लाभार्थ्यांना या योजनेतून अनुदान मंजूर झाली. त्यासंबंधीच्या पत्रकांचे व धनादेशांचे या लाभार्थ्यांना वाटप  केले. यावेळी लाभार्थ्यांनी समरजित घाटगे यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक सतीश पाटील, राजे बँकेचे संचालक उमेश सावंत विजय सोनुले आदी उपस्थित होते.

🤙 9921334545