चंद्रदीप नरकेंची भूमिका तळयात मळयात !

कोल्हापूर : शिवसेना नेते, यूवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सोमवारी कोल्हापूर दौरा झाला. शिवसेना फुटीनंतर या दौऱ्याला फारच महत्त्व होते. तळयात मळयात अशा अवस्थेत असलेले दोन माजी आमदार चंद्रदीप नरके व डॉ. सुजित मिणचेकर हे आदित्य ठाकरेंच्या सभेला उपस्थित राहणार की नाही याकडे राजकीय क्षत्रात लक्ष लागले होते. सभा सुरू असतानाच धावपळ करत डॉ. मिणचेकर यांनी उपस्थिती लावली पण नरके सभेकडे फिरकलेच नाहीत. शिवसेना फुटीनंतर त्यानी आपली भूमिका उघड केलेली नाही. एकंदरीत त्यांचे उध्दव ठाकरे यांचे बरोबर राहायच की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोबत राहायच हे निश्चित झालेले नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक तोंडावर आहे. नरकेंचा अद्याप निर्णय होत.नसल्याने कार्यकर्ते चिंतेत आहेत. त्यातच नरके भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाल्याने कार्यकत्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

कोल्हापूरचे दोन्ही खासदार धैर्यशिल माने व संजय मंडलीक शिंदे गटात दाखल झालेत.मात्र नरके व डॉ. मिणचेकर या दोन्ही माजी आमदारांची भुमिका उघड होत नव्हती.आदित्य ठाकरेंच्या सभेस डॉ. मिणचेकर उपस्थित असल्याने ते उध्दव यांच्या पाठीशी राहणार हे उघड झाले।मात्र नरकेंची भूमिका अद्याप उघड नाही. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना आघाडी झाली तर करवीर मतदार संघाची जागा विदयमान आमदारांना म्हणजेच आ. पी. एन.पाटील यांना जाणार आहे. ही अडचण लक्षात घेउन त्यानी भाजप आणि महाडीक यांचे सोबत जाणेबाबत त्याचे काही कार्यकर्त्यांनी दबाव वाढवला आहे. पण मतदारसंघातील शिवसैनिक मात्र उध्दव ठाकरेंच्या मागेच राहावे म्हणून ठाम आहेत. त्यामुळे नरके शांत असून ते अध्यक्ष असलेल्या कुभी कारखान्याची निवडणूक तोंडावर असल्याने तेथे आ.पी.एन.पाटील गटाची भूमिका काय राहील यावर लक्ष ठेउन आहेत. जिल्हा परिषद निवडणूकीच्या तोंडावर त्यांची भूमिका कार्यकत्यांची चिता वाढवणारी ठरली आहे.

🤙 8080365706