शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस हा  संकल्प दिवस म्हणून साजरा करणार

 कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुरोगामी कोल्हापूर मध्ये शिवसैनिक अबाधित राहून पक्ष्याला बळकटी आणण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस हा  संकल्प दिवस म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात साजरा करण्याचे जिल्हा प्रमुक संजय पवार यांनी पत्रकार परिषेदेत दिली आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसैनिकाला नवचैतन्य व उत्साह मिळण्यासाठी जिल्हयात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये शिवसेना सभासद नोंदणी, रक्तदान शिबिर, शुभेच्या होर्डिंग्ज,शिवसेना शाखा स्थापन तसेच विशेष म्हणजे शिवसैनिकांनी आपल्या कुटुंबा समवेत घराघरा मधे उध्दव ठाकरेनचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प त्यांनी सांगितला. जिल्ह्यामधे शिवसैनिक कार्येकार्त्यांची व पदाधिकाऱ्यांची  बैठक घेऊन   शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे ठरवले आहे