कागल (प्रतिनिधी) : माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ गटाचे कट्टर समर्थक कागलचे विद्यमान नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे त्यांचे स्वागत केले.

यावेळी घाटगे म्हणाले, स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी कागल नगरपालिकेमध्ये स्वच्छ,पारदर्शी व शाश्वत विकास केला. त्यांचे समाजभिमुख विचार पालिकेमध्ये नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी सत्तेत आल्यानंतर केवळ विकासाचा डांगोरा पिटन्याचे काम केले आहे. आंनदा पसारे व सहकाऱ्यांचे भाजपात स्वागत करणेत येत असून त्यांना सर्व प्रकारचे पाठबळ दिले जाईल.
यावेळी आनंदा पसारे म्हणाले समर्जीतसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली यापुढे आम्ही समाजकार्यात सक्रीय राहणार असून त्यांच्या काम करण्याच्या पद्धती वर आम्ही भारावून गेलो आहोत. मुश्रीफ गटात होणारी आमची कुचंबणा दूर करण्यासाठी आम्ही स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या शाश्वत विकासाच्या विचारावर कार्यरत राहुन भारतीय जनता पक्षात बिनशर्त प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी नगरसेवक आनंदा पसारे यांच्यासह अनिल वाडकर, मुन्ना अलास्कर, सुरेश मोरे, उत्तम वाडकर, धोंडीराम बुरुड, महेश कुडचे, जमीर मुल्ला, दीपक शिंदे,गणेश मोरे, संपत वाडकर,आनंदा वायदंडे, शिवाजी पाटील, मंदार व्हरांबळे,अजय पसारे,विजय पसारे, किरण पसारे, अक्षय पसारे,सुरेश भोई ,अमर संकपाळ यांच्यासह पसारेवाडी तरुण मंडळासह इतर तरुण मंडळाचे कार्यकर्ते यांनी ही राजे गटात प्रवेश केला.