दिल्ली (वृत्तसंस्था) ; नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही अखेर ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. सोनिया गांधी ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या आहेत. राहुल गांधी हे सोनिया गांधींना सोडून बाहेर आले आहे.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधी यांच्यानंतर आता सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू झाली आहे. सोनिया गांधी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत. ईडीच्या कार्यालयातील रुममध्ये 3 सदस्यांची टीम सोनिया गांधींची चौकशी करत आहे. ज्या टीमने राहुल गांधींची चौकशी केली, तीच टीम आता नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनियांची चौकशी करत आहे. इडी च्या अतिरिक्त संचालक मोनिका शर्मा या टीमचे नेतृत्व करत आहेत.
सोनिया गांधी यांच्यासमोर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत विचारणा केली. सोनिया गांधींना विचारण्यात आले की, तुम्ही तुमचे वक्तव्य देण्यास योग्य आहात का? असा प्रश्न विचारून चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. सोनिया गांधींची संपूर्ण चौकशी कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत आहे दरम्यान, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्यामुळे काँग्रेसचे नेते देशभरात निदर्शनं करत आहे. दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार निदर्शनं केली. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यासह प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.