दिल्ली (वृत्तसंस्था) : 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे शिवसेना गट तयार करून पत्र देऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदाला मान्यता दिल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली येथे सांगितलं आहे.दिल्लीत येण्याचं दुसरं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले कि बुधवारी ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. त्यासंबंधी तज्ज्ञांसोबत बैठक, चर्चा करण्यासाठीही मी दिल्लीत आलो,
“बाळासाहेबांचे विचार, आमचे गुरूवर्य आनंद दिघे यांचे विचार घेऊन आम्ही महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन केलं. जी भूमिका आम्ही 50 आमदारांनी घेतली, त्याचं समर्थन राज्यभरातून शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केलंच आहे.त्याच प्रमाणे महाराष्ट्रातल्या जनतेनंही केलं आहे. सरकार स्थापनेनंतर आम्ही अनेक निर्णय तातडीने घेण्यास सुरूवात केली असं एकनाथ शिंदे यांनी म्हंटले
आम्हाला केंद्र सरकारचा पूर्ण पाठिंबा महाराष्ट्राच्या सरकारला आहे. अस पंतप्रधानांनी सांगितलं आहे की, राज्याच्या विकास कामासाठी कुठेही काही कमी पडू देणार नाही,” असं एकनाथ शिंदे यांनी आवर्जून सांगितल .