कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील महत्त्वाचे विभाग जसे पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद, महानगरपालिका इत्यादी सर्व महत्त्वाच्या यंत्रणांनी पावसाळा कालावधीमध्ये त्यांच्या विभागामध्ये पूर व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्ष 24 तास सुरू केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

नागरिकांना या विभागांशी निगडित माहितीची आवश्यकता असेल, जसे की धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग नद्यांची पाणी पातळी तसेच जिल्ह्यातील कोणते मार्ग सुरू आहेत किंवा कोणते मार्ग बंद आहेत इत्यादी बाबतच्या माहितीसाठी नागरिक या विभागांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतात.