वडणगे : बी. एच. दादा प्रेमी युवक मंचच्या वतीने रेस्क्यू बोटसाठी निधी संकलन या उपक्रमाअंतर्गत लोकवर्गणीच्या माध्यमातून चिखली, आंबेवाडी, वडणगे या गावांसह परिसरातील पुरग्रस्थ गावांना मदतकार्यासाठी नुकतीच रेस्क्यू बोट खरेदी केली. त्याचा लोकार्पण सोहळा करवीरचे आमदार पी.एन. पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या हस्ते संपन्न झाला.

वडणगे परिसरामध्ये गेली अनेक वर्षे समाज कार्यामध्ये सतत अग्रेसर असणाऱ्या युवक मंचच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून रुग्णवाहिका खरेदी करण्यात आली होती त्याचा वापर आज परिसरातील अनेक रुग्णांना होत आहे . कोणत्याही उपक्रमाचा संकल्प एकदा हाती घेतला तर तो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करून लोकांना सेवा देण्याचा प्रामाणिक हेतू युवक मंचच्या तरुणांचा नेहमीच असतो.
सन 19 व 21 या दोन्ही सालच्या पूरावेळी पुरग्रस्थाना बोटीची आवश्यकता कीती गरजेची आहे हे युवक मंचने पाहिले होते त्यामुळे 2021 च्या पूर परिस्थिती वेळीच युवक मंचच्या सर्व युवकांनी रेस्क्यूबोट खरेदी करण्याचा संकल्प हाती घेतला होता त्यानुसार आज प्रत्यक्षात चिखली आंबेवाडी व परिसरातील पुरग्रस्थ गावांना बोट लोकार्पित करण्यात आली.
करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांनी जेथे अडचण तेथे मदतीसाठी युवक मंचचे तरुण तात्काळ धावत जाऊन लोकांना मदतकार्य देण्याची भूमीका सातत्याने घेत आसतात त्याबद्दल सर्व उपक्रमांचे कौतुक केले .
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी युवक मंचने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हातामध्ये घेतलेले मदत कार्य उल्लेखनीय असून इतर गावातील तरुणांनीही याचा आदर्श घ्यावा असे गौरवोद्गार काढत शासनावरचा ताण कमी करण्याचा प्रयप्न युवक मंचच्या बोटीमुळे तरुणांनी हातात घेतल्याबद्दल सर्व सदस्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी करवीरच्या तहसीलदार शितल मुळे- भांबरे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी. एच. पाटील, प्रसाद संकपाळ ज्येष्ठ नेते रघु पाटील, बाळासाहेब खाडे, राजेंद्र सुर्यवंशी, पांडबा यादव, एम. जी. पाटील, केवलसिंह रजपूत, सरपंच सचिन चौगले, चेअरमन बी. आर. पाटील, भैय्या भुयेकर, शिवाजी कवठेकर, बबलू पाटील, बटूसिंह राजपूत, प्रभाकर पाटील, श्रीधर पाटील, धनाजी चौगले, सरदार पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक युवा नेते रविंद्र पाटील यांनी केले. सुत्रसंचलन श्री आर बी देवणे सर यांनी केले.