पाण्यासाठी बाबा जरगनगरात रास्ता रोको

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अपुऱ्या व कमी दाबाने अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने मंगळवारी सायंकाळी बाबा जरगनगर जकात नाका येथे पाचगाव येथील नागरिक रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाचे बापाचं, आमच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, महापालिकेचा धिक्कार असो, अशा घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

आज झालेल्या आंदोलनामध्ये शाखा अभियंता प्रिया पाटील यांनी आठ दिवसाच्या आत पाचगाव उपनगर भागातील पाणी सुरळीत होईल, असे आश्वासन दिले. यावर नागरिकांनी जर पाणी सुरळीत नाही झाले तर सुभाष नगर पंपिंग स्टेशनला आम्ही 21 तारखेला टाळे ठोकणार (कुलूप लावणार) असे सांगून या अटीवरच रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे भर पावसात देखील जेष्ठ नागरिक, महिला, पुरुषांची संख्या लक्षणीय होती.

सागर दळवी (ग्रा.पं. सदस्य पाचगाव,) परितोष उरकुडे ओंकार कुलकर्णी, प्रतिक साळुंखे श्रीधर वष्ठ, चंद्रकांत ऐनापुरे, अनंत उचगावकर, संजय शिंदे, दिलीप इंगळे, विजयसिंह घोरपडे अविनाश चव्हाण ,गजानन साळोखे ,दीपक पोतदार, भिकाजी गाडगीळ विशाल पाटील विक्रम शिंदे अमर कारंडे,तसेच सुवर्णा पवार, शितल दळवी, राजश्री सूर्यवंशी, गिरीजा मुंगळे चित्रा शेटे, शशिकला रत्नाकर, ज्योती जाधव, अर्चना बुवा यांच्यासह शहर उपाभियंता एन. एस. पाटील, शाखा अभियंता प्रिया पाटील, करवीर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे, उपनिरीक्षक अविनाश पवार उपस्थित होते.