कसबा बावडा (वार्ताहर) : नैसर्गिक आपत्तीच्या काळात बावडा रेस्क्यु फोर्स जनतेच्या मदतीला धावेल, असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.

बावडा रेस्क्यु फोर्सला टीमला पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास बचावकार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचे वाटप आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
दोन वर्षापूर्वी बावडा रेस्क्यु फोर्सची निर्मिती झाली. सामाजिक उपक्रमात सहभागी असलेल्या बावड्यातील जवळपास ७० युवक या रेस्क्यु फोर्समध्ये सहभागी झाले. पुराच्या काळात आणि कोरोना काळात या फोर्सने प्रभावी काम केले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास ही फोर्स नेहमीप्रमाणे मदतीसाठी सर्वात पुढे असेल याची खात्री आहे. मदत कार्यात या फोर्सला कोणतही अडथळा येवू नये याकरिता लाईफ जॅकेट, स्टेचर, रबरी ग्लोज असे आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
सर्वसामान्य नागरिकांना अडचणींच्या काळामध्ये मदत करण्यासाठी दोन वर्षापूर्वी बावडा रेस्क्यु फोर्सची संकल्पना मांडली होती ती सत्यात उतरली असल्याबद्दल आमदार ऋतुराज पाटील यांनी समाधान व्यक्त केले. नैसर्गिक अपत्तीच्या काळात बावडा रेस्क्यु फोर्स जनतेच्या मदतीला धावेल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला. बावडा रेस्क्यु फोर्सच्या कामाचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. समन्वयक मानसिंग जाधव यांनी दोन वर्षातील मदत कार्याची माहिती दिली .
या साहित्य वितरण प्रसंगी पंकज घाटगे, प्रदीप उलपे, ताौसिफ शेख, नंदू पाटील, , जितू कांबळे, विनायक आळवेकर, अशांत मोरे,निलेश पिसाळ यांच्यासह बावडा रेस्क्यु फोर्सचे सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक तानाजी चव्हाण यांनी तर आभार निशिकांत कांबळे यांनी मानले .