नवी मुंबई (प्रतिनिधी) : ‘गोकुळ’च्या मुंबई शाखेच्या प्रारंभीच्या काळात कठीण परिस्थितही जुन्या कर्मचाऱ्यांनी महत्वपूर्ण योगदान दिल्यामुळेच गोकुळ ने मुंबईत प्रगतीची गरुडझेप घेतली. त्यामुळे ‘गोकुळ’च्या मुंबई शाखेतील जुने कर्मचारी गोकुळचे भूषण आहेत असे उद्गार गोकुळच्या मुंबई शाखेचे महाव्यवस्थापक दयानंद पाटील यांनी काढले.
नवी मुंबई शाखेकडील सेवानिवृत्त कर्मचारी – अधिकाऱ्यांच्या निरोप समारंभात ते बोलत होते .
मुंबई शाखेतील प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सन्मानानिमित्त वाशी शाखेत निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी दयानंद पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.
स्वागत पांडुरंग एकशिंगे यांनी केले. याप्रसंगी अशोकराव जगताप, मधुकर मगदूम, सहायक व्यवस्थापक डी डी पाटील, सुनील कडुकर यांचीही भाषणे झाली.
या कार्यक्रमास सहाय्यक व्यवस्थापक बाळासाहेब धायगुडे, सहाय्यक दूध संकलन अधिकारी आशिष पाटील, गुण नियंत्रण अधिकारी श्रद्धा परब, गोकुळ कर्मचारी पतसंस्थेचे संचालक रमेश जगताप आदी मान्यवरासह गोकुळ कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार सागर टोपकर यांनी मानले.