अठरा कारभारीच सत्ताधाऱ्यांना भारी पडणार : जोतीराम पाटील

कागल (प्रतिनिधी) : शिक्षक बँकेतील एकाधिकारशाही हुकूमशाही आणि मनमानी कारभाराला अंकुश लावण्यासाठीच जिल्ह्यातल्या सर्व प्रमुख संघटना एकत्र येऊन ही महाआघाडी निर्माण झाली आहे. यावेळी हीचं आघाडी बँकेत परिवर्तन घडवणार आहे. त्यामुळेच सत्ताधारी बँकेच्या कारभाराबद्दल न बोलता आमच्या महाआघाडीबद्दल बोलत आहेत. या आघाडीचे अठरा कारभारीच सत्ताधाऱ्यांना भारी पडणार असून त्यातून बँक प्रगतीपथावर येणार आहे. म्हणूनच भीतीने ती अशी वक्तव्य करत आहेत, असा घणाघाती आरोप जोतीराम पाटील यांनी केला. राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीच्या कागल येथील प्रचार मेळाव्यात ते बोलत होते.

सुनिल पाटील म्हणाले, कागलची शाहू आघाडी विजयाच्या गुलालाने कै. विलास पाटील गुरुजी यांना आदरांजली वाहणार आहे.

शिक्षक नेते कै. विलास पाटील गुरुजी यांच्या नेतृत्वाखालील शाहू आघाडी ही अभेद्य आहे.शिक्षक बँकेच्या निवडणुकीत या आघाडीच्या माध्यमातून दिले जाणारे मताधिक्य हे पॅनलच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे.

यावेळी रवी पाटील म्हणाले एकाधिकार हुकूमशाही वृत्तीमुळे शिक्षक बँकेची प्रगती खुंटली आहे. सभासदांच्या पाठिंब्यावर आमचा विजय निश्चित होणार असून १७ कारभारी व १८ पुढारी यांचा कारभार निकालानंतरच सत्ताधाऱ्यांना समजेल.

निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांनी व्याज दर कमी केला असून सभासदांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आमच्या ताब्यात सत्ता आल्यास बँकेची नेत्रदीपक प्रगती करून सभासदांचे आर्थिक उन्नती करणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

यावेळी ओमाजी कांबळे बाळासाहेब निंबाळकर सुरेश सोनगेकर, सुकुमार पाटील, विद्या चव्हाण, प्रमोद तौंदकर, राजेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत जयवंत पाटील यांनी सूत्रसंचालन रमेश जाधव यांनी केले.

यावेळी राजर्षी शाहू आघाडीस सेवानिवृत्त शिक्षक संघटना यांनी पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

या मेळाव्याला विलास चौगले, ब .बा .पाटील, पा.वि. पाटील, प्रकाश चौगुले, काका पाटील गुरुजी, रमेश कांबळे, अरविंद पाटील, बाळासो राणे आदी उपस्थित होते.

🤙 9921334545