अखेर नाव ठरलं … ‘शिवसेना- बाळासाहेब ठाकरे गट’

मुंबई : शिवसेनेत बंडखोरी करून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन गट तयार करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी त्यांच्या गटासाठी ‘शिवसेना- बाळासाहेब ठाकरे’ असं नाव निश्चित केल्याचे  बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.

सुरुवातीला एकनाथ शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला होता. मात्र, त्यासाठी तांत्रिक अडचणी येणार असल्याने आता गट स्थापन केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह सोबत असलेल्या आमदारांच्या गटाचे नाव ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट’ असं दिलं आहे

आमदार दीपक केसरकर म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांशी आमची बांधिलकी आहे. आम्ही स्वतंत्र गट स्थापना केला आहे. आम्ही कुणामध्येही विलीन होणार नाही. गटाचं स्वतंत्र अस्तित्व असणार आहे. कुणीही पक्षातून बाहेर पडलेलं नाही. विधिमंडळात मात्र आमची भूमिका वेगळी असणार आहे. एकत्र निवडणूक लढवूनही भाजपपासून दूर झालो. तेव्हा भाजपचे कार्यकर्ते दूर झाले का? रस्त्यावर आले का? मोडतोड केली का? पण तरी उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय मान्य केला. पण जेव्हा शिवसेनेचं अस्तित्व संपवायला आपले मित्रपक्ष निघाले तेव्हा गेल्या दीड वर्षापासून आम्ही ही भूमिका मांडली आहे. ती उद्धव ठाकरेंना सातत्याने सांगितली आहे.

🤙 8080365706