विधान परिषद निवडणुकीत आमदारांवर दबाव टाकण्यासाठी ईडी, सीबीआयकडून फोन

मुंबई : विधान परिषदेच्या  निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणा हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांवर दबाब टाकण्यासाठी फोन केले जात असल्याचाही आरोप नाना पटोले यांनी केला.

केद्राच्या तपास यंत्रणांच्या दुरूपयोगाबाबत नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बातचीत करताना माहिती दिली. यावेळी त्यांनी केंद्रावर आरोप करत, योग्य वेळ येईल तेव्हा याचा खुलासा करीन तसेच, जनतेसमोर भूमिका मांडू असे त्यांनी सांगितले.

पटोले म्हणाले, आमच्याकडे जो रेकॉर्ड आला आहे, त्या रेकॉर्डच्या माहितीनुसार, ईडी आणि सीबीआयचा याचा दुरूपयोग कसा चालतोय हे आम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून समजलेले आहे. तसेच, कसे कोणाला टार्गेट केले जाते, तुम्ही आम्हाला मत द्या नाही तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू, या पद्धतीच्या भावना अनेक ठिकाणी आलेल्या आहेत. त्यामुळे ही परिस्थिती लोकशाहीला घातक आहे. भाजपा ईडी आणि सीबीआयचा हत्यार म्हणून वापर करते आहे. तसेच त्यांनी याबाबत सामंजस्यपणा न दाखवल्यास आम्ही याचा खुलासा जनतेसमोर करू.

🤙 9921334545