विधानपरिषदेसाठी भाजपचे पाच उमेदवार; पंकजा मुंडे, चित्रा वाघ, विनोद तावडे यांचा पत्ता कट

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले पाच उमेदवार निश्चित केले आहेत. यामध्ये प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली असून नव्या तीन नावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांच्या नावाचा समावेश आहे.

 मात्र, या यादीतून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, विनोद तावडे, चित्रा वाघ यांची नावे वगळण्यात आली आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून विधानपरिषदेसाठी संधी देण्यात येणार का, याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू होती. मात्र यावेळी पंकजा यांना डावलण्यात आले आहे. पंकजा मुंडे या विधान परिषदेत जाण्यासाठी उत्सुक होत्या. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये तसे संकेतही दिले होते. मला विधानपरिषदेत जाण्याची संधी मिळाल्यास, मी त्या संधीचं सोनं करेन, असेही पंकजा यांनी म्हटले होते. रोहित पवारांना शह देण्याच्या हेतूने कर्जत-जामखेडमध्ये विधानसभेला पराभूत झालेल्या राम शिंदे यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले आहे. या