कोल्हापूर : याच भूमीचा पुत्र, या भूमीचा राज्यकर्ता असावा ही राजमाता जिजाऊंच इच्छा शिवराज्याभिषेकामुळे पूर्ण झाली, असे प्रतिपादन डॉ. अमर अडके यांनी केले. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात शिवस्वराज्य दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात डॉ. अडके यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे चित्र उभे करून उपस्थितांना भारावून टाकले.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त डॉ. डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठच्या वतीने डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पिटल सभागृहात हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास कुलसचिव डॉ.व्ही.व्ही.भोसले, शिवाजी विद्यापिठाचे परीक्षा नियंत्रक आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे नूतन संचालक डॉ. ए. एन. जाधव, वित्त अधिकारी श्रीधर स्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, फिजिओथेरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जावेद सागर, नर्सिंगग कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुचित्राराणी राठोड, डॉ. आर .एस.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून करण्यात आलं. उपकुलसचिव संजय जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांच स्वागत केलं, तर कुलसचिव डॉ व्ही. व्ही. भोसले, शिवाजी विद्यापिठाचे परीक्षा नियंत्रक आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे नूतन संचालक डॉ. ए. एन. जाधव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन डॉ. आडके यांचा सत्कार करण्यात आला.
मैत्रेय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अमर अडके यांनी उपस्थितांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वातुन शिवराज्याभिषेक दिन सोहल्याचे चित्र हुबेहुब उभे केले. राज्याभिषेक आणि सिहांसनरोहण सोहळा या दोन गोष्टी वेगळ्या असल्याचे सांगत सिहांसनरोहण सोहळ्यावेळी सिहांसनावर बसण्याआधी शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी धारातीर्थ पडलेल्या सगळ्या मावळ्यांच्या आठवणींन गहिवरून आल्याच त्यांनी सांगितले.
हा राज्याभिषेक म्हणजे फक्त समारंभ नव्हता, तर प्रजेच रक्षण, राज्याचं रक्षण, भूमीच रक्षण, समुद्राच रक्षण, नद्यांचं रक्षण, पर्वताचं रक्षण यासाठी तो राज्याभिषेक होता असे त्यांनी सांगितले. २० हजरांहून अधिक लोकं उपस्थित होते. याच भूमीचा पुत्र, या भूमीचा राज्यकर्ता व्हावा अशी राजमाता जिजाऊंची इच्छा होती, ती या राज्याभिषेकामुळं पूर्ण झाली, असे प्रतिपादन त्यांनी केले. या राज्याभिषेकाला तत्कालीन ३२ वेगवेगळ्या सत्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येकांनी सोबत करारनामा आणला होता.
स्वतः च्या नाण्याची निर्मिती इंग्रजांनी तुमची नाणी ओबडधोबड असून ती आम्ही तयार करून देतो असा प्रस्ताव शिवरायांच्या पुढे ठेवला. पण महाराजांनी तो धुडकावून लावत आमची नाणी आम्हीच निर्माण करू असे ठणकावून सांगितले. यावेळी चुकीचा किंवा स्वराज्याला धोकादायक कुणाचाही एकही करार त्यांनी मान्य केला नाही. यावरून त्यांचे परराष्ट्र धोरण स्पष्ट होते. राजमाता जिजाऊ यांनी स्वखर्चाला फाटा देऊन वाचविलेल्या १ कोटी रुपये त्यांनी शिवराज्याभिषेकासाठी ठेवले होते, पुढे याच पैशातून अनेक किल्ले स्वराजात सामील करण्यात आले. हाच खऱ्या अर्थानं शिवराज्याभिषेक होता, अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
शिवप्रेमी अनिकेत शिंदेचा विशेष सत्कार
या कार्यक्रम प्रसंगी वाघ नख्या, जिरे टोप, तलवार, राज्याभिषेकदिन वेळचे नाणे अशा सर्व गोष्टींच्या प्रतिकृतीची निर्मिती आणि त्याची जोपासणूक करणारे अनिकेत शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.