सेनेचं अखेर ठरलं! दोन संजय उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज्यसभेच्या उमेदवारीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात एक तास चर्चा झाली. आमच्यासाठी सहाव्या जागेचा विषय संपल्याचे सांगत संजय पवार हेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील, उद्या एक वाजता मी आणि संजय पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले.

पत्रकाराशी बोलताना राऊत म्हणाले, अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीमधील नेते उपस्थित राहणार आहेत. आमच्याकडे मतांचा कोठा हा अधिक आहे. आता छत्रपतींचे काय होणार असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की छत्रपती यांच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही.

शिवसेनेने राज्यसभेसाठी संजय राऊत  यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. तर सहाव्या शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या नावाची शिफारस केली आहे. यासंदर्भात मंत्री अनिल परब आणि संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते.