हैदराबाद : भारतीय मुस्लिमांचा मुघलांशी कोणतंही नातं नाही, मात्र मुघल राजांच्या बायका कोण होत्या? असा सवाल ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत हे मत व्यक्त केलं आहे. औवेसी यांच्या या पोस्टनंतर आता वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
देशभरात वेगवेगळ्या मशिदींवरून वाद सुरू आहे. मुघलांनी मंदिरं पाडून त्या जागेवर मशिदी बांधल्याचा आरोप केला जात आहे. त्यातून मुस्लीम विरोधी वातावरण निर्माण केला जात असल्याचा आरोपही होतोय. ओवेसी यांनी भारतीय मुस्लिमांबाबत मोठं विधान केलं.
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत वाद सुरू आहे. वाराणसीच्या ज्ञानवापी आणि मथुराच्या शाही इदगाह मशिदीचे प्रकरण न्यायालयात आहेत. कुतुबमिनारचा मुद्दाही वेळोवेळी चर्चेत येत असतो. आग्राच्या ताजमहालमधील २२ बंद खोल्या उघडण्यासाठी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती, तीही फेटाळण्यात आली होती. कारण या सर्व गोष्टी इतिहासाशी संबंधित आहेत. आणि मध्यभागी मुघल काळ आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ज्ञानवापी प्रकरण औरंगजेबशी जोडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. प्रकरण बाहेर आले तर पुढे जाईल, असेही ते म्हणाले होते. आता ओवेसींनी फेसबुकवर इतिहास आणि मुघल कालखंडाबद्दल पोस्ट केली आहे. भारतातील मुस्लिमांचा मुघलांशी कोणताही संबंध नाही, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.
भारतातील मुस्लिमांचा मुघलांशी संबंध नाही, पण मुघल सम्राटांच्या पत्नी कोण होत्या ते सांगा, असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी गुजरातमधील सुरत येथे एका सभेला संबोधित करताना पुष्यमित्रांनी उद्ध्वस्त केलेल्या बौद्ध मंदिरांबद्दल भाजप का बोलत नाही, असेही म्हटले होते.