भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले?: निलेश राणेंचा टोला

मुंबई : हे होणारच होतं… पवार साहेब आणि शब्द पाळला असे होऊ शकत नाही. भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले? राजे जर शिवसेनेसोबत जाणार तर संजय राऊत दुसऱ्या सीटवर आहेत. ज्यांनी मराठा मुक मोर्चाची मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली होती, विसरू नका, असे ट्विट नितेश राणे यांनी केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी शिवसेना सांगेल त्या उमेदवाराला अतिरिक्त मतदान केले जाईल. मग तो उमेदवार संभाजीराजे छत्रपती किंवा अन्य कोणी असो, त्यालाच राष्ट्रवादी मतदान करेल असे म्हटले आहे. यावरूनच भाजप नेते निलेश राणे यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. शरद यांनी यापूर्वी संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासंदर्भात राष्ट्रवादी अनुकूल असल्याचं सांगितल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी हे वक्तव्य केले आहे.

🤙 8080365706