मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते देखील आता अयोध्येला जाणार असल्याचं समोर आलं आहे. गुणरत्न सदावर्ते यांची पोलिसांनी मुंबईत बुधवारी पुन्हा चौकशी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सदावर्ते यांनी अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले.
सदावर्ते म्हणाले, अयोध्येत साधू आणि महंत आमचं स्वागत करणार आहेत. ‘डंके की चोट’पर यापुढे विरोधकांना उत्तर देऊ. आमचे हक्क राज्य सरकार असे पायदळी तुडवू शकत नाही. कष्टकरी जनसंघ हे हिंदुस्थानला सुजलाम सुफलाम करण्यासाठी या महिन्याच्या शेवटी अयोध्येला जाणार असून प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत. जय श्रीराम आणि जय भीम म्हणणारे आता कुणालाही घाबरत नाहीत. आपण राम जन्मभूमीच्या केसमध्ये वकील होतो, त्यामुळे आपल्याला अयोध्येतून बोलावणं आले आहे. सदावर्तेंसह त्यांच्या पत्नी अॅड जयश्री पाटील देखील या महिन्याच्या अखेरपर्यंत अयोध्येला जाणार आहेत.