शिवसेनेच्या उप जिल्हाप्रमुखपदी संजय पाटील 

                           

कोल्हापूर :  शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी संजय बळवंत पाटील- खुपीरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे करवीर विधानसभा मतदार संघातील पन्हाळा- गगनबावडा या तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

संजय पाटील हे कुंभी कासारी साखर कारखान्याचे  अनेक वर्षापासुन संचालक आहेत. सहकार क्षत्रातील अनेक संस्थामध्य ते कार्यरत आहेत. खा. संजय मंडलिक व माजी आमदार चंद्रदिप नरके यांचे निकटवर्तीय समजले जातात. कोल्हापूर शासकीय विश्रामग्रह येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवाडकर यांच्या हस्ते व माजी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या उपस्थितीत त्यांना हे नियुक्ती पत्र देण्यात आले. भविष्यात शिवसेना पक्ष वाढीस व पक्ष मजबुतीसाठी आपले प्रयत्न राहतील. प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा ही संकल्पना राबवणार असल्याचे त्यानी न्युज मराठी 24 शी बोलताना सांगितले.