शिराळा न्यायालयानंतर आता राज ठाकरेंवर दुसरं अजामीपात्र वॉरंट जारी

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात शिराळा न्यायालयानंतर आता दुसरं अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. बीडमधील परळीच्या न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. जामीन मिळवल्यानंतर राज ठाकरे न्यायालयात सतत गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर आता अजामीपात्र वॉरंट काढण्यात आले आहे.

मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर शिराळा आणि परळी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जामीन घेतल्यानंतर परळी कोर्टात सतत गैरहजेरी लावली आहे. त्यामुळे न्यायालयाने १० फेब्रुवारीला अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. तसेच १३ एप्रिलपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. यामुळे जर राज ठाकरेंनी पुन्हा गैरहजेर राहिले तर दुसऱ्यावेळी पुन्हा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात येईल. यापूर्वी सांगली जिल्ह्यातील शिराळा न्यायालयानेसुद्धा अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. राज ठाकरेंना सांगलीच्या शिराळा न्यायालयात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. राज ठाकरेंनी २००८ साली रेल्वे भरतीत भूमिपुत्रांना प्राधान्य द्या, अशी मागणी केली होती. या मागणीदरम्यान केलेल्या आंदोलनात राज ठाकरेंना अटक झाली होती. राज ठाकरेंच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

राज ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचे कलम लावा

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात राजद्रोह, शांतता भंग आणि सार्वजनिक सलोख्याला बाधा आणल्याच्या आरोपांतर्गत कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही जनहित याचिका केली आहे. ठाकरे यांच्या विविध जाहीर सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या मुद्दय़ाकडेही याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. तसेच ठाकरे यांच्या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलने करू शकतात. परिणामी समाजातील शांतता भंग होण्याची शक्यता असल्याची भीतीही याचिकेत उपस्थित करण्यात आली आहे.

🤙 8080365706